पुणे जिल्हा | धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे काम उल्लेखनीय

नारायणगाव, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील सहकारी पतसंस्थांमध्ये आवर्जून उल्लेख करावा अशा धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे, असे आमदार अतुल बेनके यांनी नमूद केले.
धर्मवीर पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण खेळीमेळीत पार पडली, त्यावेळी आमदार बेनके बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ सभासद व ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, नारायणगावचे सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ, विक्रांत चे अध्यक्ष संतोष वाजगे, अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे,
धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रवीण डेरे, उपाध्यक्ष मेहबूब काझी, संचालक सुभाष दरंदाळे, राजेंद्र कोल्हे, कैलास औटी, संजय देशमुख, एकनाथ तांबे, हेमंत कोल्हे, हितेश श्रीवत,
काशिनाथ अल्हाट, राजू लोखंडे, सारिका डेरे, संध्या गायकवाड, सिताराम खेबडे, योगेश गांधी, सल्लागार राजेश डेरे, राहुल बनकर, डॉ. विकास डेरे, राहुल नवले, समीर मेहत्रे, प्रसाद फुलसुंदर, शरद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार बेनके म्हणाले की, पतसंस्था आपल्या उत्तम कामकाजामुळे ओळखली जात असून स्वर्गीय गुलाबराव डेरे यांनी संस्थेचा पाया मजबूत केला आहे . त्यांच्या पुढाकारातूनच स्वर्गीय नामदार वल्लभ बेनके यांनी जुन्नर तालुका फेडरेशनची निर्मिती केली असल्याचे सांगितले.
वार्षिक सभेत संस्थेचे ज्येष्ठ सभासद आशिष माळवदकर, भागेश्वर डेरे, अशोक औटी, शिवाजी गायकवाड, शैलेश औटी, सोपान कोल्हे, विक्रम भुजबळ, अंकुश चव्हाण, तुकाराम कोल्हे, खंडेराव डेरे सभासदांनी प्रश्न विचारले.
वार्षिक सभेचे प्रास्ताविक उपाध्यक्ष मेहबूब काझी तर सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर औटी व संचालक हेमंतभाऊ कोल्हे यांनी तर संचालिका सारिका डेरे यांनी आभार मानले.
55 लाख 59 हजारांचा नफा
संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात उल्लेखनीय कार्य करत 75 कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल केली असून संस्थेस 55 लाख 59 हजार नफा झाला आहे.
संस्थेला सहकारातील उत्कृष्ट कार्याबद्दल 25 ते 50 कोटी गटात महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे अध्यक्ष प्रवीण डेरे यांनी सांगितले.
लाभांश 12 टक्के मिळावा अशी मागणी
वार्षिक सभेत संचालक मंडळाने सभासदांना 10 टक्के लाभांश सभेपुढे मंजुरीसाठी सादर केल्यानंतर सभासदांनी 12 टक्के लाभांश मिळावा अशी मागणी केली.
तसा वाढीव प्रस्ताव खात्याला सादर करून मंजुरीनंतर वाढीव लाभांश व दीपावली भेट म्हणून किराणा सामान सभासदांना वितरित केले जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर औटी यांनी सांगितले.





