सुंदर दिसण्याच्या नादात महिलेचा चेहराच बिघडला, पाहा नेमकं काय घडलं

मुंबई – लूक अधिक आकर्षक बनवण्यासाठी महिला अनेकदा विविध प्रकारचे सौंदर्य उपचार घेतात. यासाठी महिला ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये जाऊन तिचा मेकओव्हर करते आणि त्वचेपासून केसांपर्यंत विविध प्रकारचे उपचार घेते.
नुकतीच एक घटना समोर आली आहे ज्यात एका महिलेने स्वतःला आकर्षक दिसण्यासाठी आयब्रो ट्रिटमेंट करून घेतली आहे. त्यानंतर महिलेला अॅलर्जी झाली आणि तिच्या चेहऱ्यावर सूजही आली. या महिलेला बरे होण्यासाठी सुमारे आठ ते दहा आठवडे लागले. व्हिडिओ शेअर करून या महिलेने अशी चूक न करण्याचा इशारा दिला आहे कारण हा काळ तिच्यासाठी खूप भयावह होता.
31 वर्षीय मिशेल क्लार्कने स्वतःला चांगला लूक देण्यासाठी तिच्या भुवया रंगवण्याचा निर्णय घेतला होता. पार्लरमध्ये तिच्यासोबत असा अपघात घडला की आता ती वाचणार नाही असे तिला वाटले. वॅक्सिंग करून आणि भुवया रंगवून घरी आल्यावर तिच्या भुवयांना भयंकर ऍलर्जी जाणवली. त्यावेळी काहीतरी गडबड झाल्याचे तिच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली तेव्हा तिचा चेहरा सुजला होता आणि तिचा चेहरा पाहून तिला धक्काच बसला.
मिशेलला आयब्रो कलरची अॅलर्जी होती. आयब्रो वॅक्सिंगमध्ये मेणाचा वापर केल्यामुळे तिची प्रकृती बिघडली. याचे कारण असे की रंगासाठी वापरण्यात येणाऱ्या डाईमध्ये अनेक रसायने असतात. मेणाच्या साहाय्याने वॅक्सिंग केले जाते आणि त्यानंतर ते रंगीत होते, तेव्हा ती रसायने त्वचेत जातात. तिला अॅलर्जी होताच तातडीने डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले.





