भरधाव कारने महिलेला फरफटत नेलं; मालाडमध्ये 27 वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत

Malad Accident | मुंबईत पुन्हा एकदा एका आलिशान कारच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मालाडमध्ये भरधाव कारने धडक दिल्याने एका २७ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अनुज सिन्हा याला अटक केली आहे. आरोपी हा मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी आहे.
आरोपीने महिलेला धडक दिल्यानंतर डिव्हायडरपर्यंत फरफटत नेलं होतं. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. जमावाने आरोपीला गाडीतून बाहेर काढत चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. तसेच त्याच्या कारचीही तोडफोड केल्याचं दिसून आलं. Malad Accident |
#WATCH | A 27-year-old woman died after being hit by a speeding car in the Malad area of Mumbai last night. The accused driver took the injured woman to the hospital, where the doctors declared her dead. Malad Police have registered a case against the accused and arrested him.… pic.twitter.com/RZCOjTCwVO
— ANI (@ANI) September 4, 2024
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय महिला शहाना काझी या मेहंदी क्लास संपवून घरी परतत होती. तेव्हा एका आलिशान भरधाव कारने तिला जोरदार धडक दिली. त्यानंतरही कारचालक थांबला नाही तर महिलेला डिव्हायडरपर्यंत फरपटत नेलं. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. त्यानंतर प्रत्यक्षदर्शी आणि कार चालकाने महिलेला रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला होता. Malad Accident |
कार चालक अनुज सिन्हा मर्चंट नेव्हीमध्ये काम करतो आणि तो सुट्टीवर होता. गाडी चालवत असताना चालक शुद्धीत होता की मद्यधुंद अवस्थेत होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मालाड पोलिसांनी चालकाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच याबाबतची माहिती मिळेल.
काही दिवसांपूर्वीच वरळीत हिट अँड रन प्रकरणात एका महिलचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच मालाडमध्ये भरधाव आलिशान कारने महिलेला धडक दिल्याने तिचा दुर्दैवी अंत झाला.
हेही वाचा:
‘पंतप्रधान मोदींमुळे बांगलादेशातील हिंदू वाचले’ ; उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांचा मोठा दावा





