मुंबई : संतोष देशमुख हत्याप्रकरणांत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी कॉग्रेंसच्या कोट्यातील मंत्र्यांच्या रिक्त जागेवर डोळा ठेवून मंत्रिपदासाठी उत्सुक असलेले छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची जागा रिक्त झाली.परंतु त्यावर मंत्रीपदी स्वत:ची वर्णी लावण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचा दावा आहे.पक्षाला त्यांचा हा दावा लवकरच मान्य करावा लागेल असे राष्ट्रवादीचे अन्य नेतेच खाजगीत सांगत आहेत.याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी भुजबळ उपलब्ध होऊ शकले नाहीत. तथापि,या जागेवर अधिवेशनानंतर वर्णी न लागल्यास छगन भुजबळ मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गोटात खळबळ माजवतील. तसेच त्यांच्या समर्थक बारा मंत्र्यांसह अजितदादांना भुजबळ जोर का धक्का देतील असे भुजबळांचे नाशिकमधील समर्थक कार्यकर्ते सांगत आहेत. याआधी राष्ट्रवादी त्यागण्याची भाषा करत भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेत राज्य मंत्रिमंळात आपली वर्णी लावावी अशी मागणी करुन अजितदांनाही धक्का दिला होता. भुजबळांचे सध्या नशिबही जोरात आहे असे दिसत आहे. नुकतेच मंत्री माणिकराव कोकाटेंना न्यायालयाने बोगस कागदपत्रं मिळवून शासनाला त्यांनी फसवल्याबद्दल दोन वर्षांची कारावासाची शिक्षा व अर्थिक दंड ठोठावला आहे.त्यांस त्यांनी सत्र न्यायालयातून स्थगिती मिळवून तुर्तास दिलासा मिळवला आहे.तथापि त्यांच्याही राजीनाम्याची मागणीसाठीविरोधक काहूर माजवून सरकारला अडचणीत आणू पाहात असल्याने सरकर कोंडींत सापडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यातही मध्यमार्ग काढत कोकाटेप्रकरण संपविण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगण्यात येत आहे.