iPhone 17 launch : आयफोनप्रेमींसाठी एक बातमी समोर आली आहे. आयफोन या महागड्या मोबाईल कंपनीने त्यांचा आयफोन १७ लॅान्च केला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून या फोनची वाट पाहणाऱ्यांची चाहत्यांची अखेर प्रतीक्षा संपली आहे. भारतीय वेळेनुसार काल रात्री ९ सप्टेंबर या दिवशी iPhone 17 launch करण्यात आला आहे. या नवीन सीरीजच्या फोनमध्ये अनेक बदल आणि नवे फीचर्स अॅड करण्यात आले आहेत. हा आयफोन आतापर्यंतचा सर्वांत स्लीम आयफोन असणार आहे. या फोनचं नाव आयफोन एअर असं ठेवण्यात आलं आहे. अॅपलने त्यांच्या प्लस सिरीजऐवजी आता एअर सिरीजमध्ये हा फोन बाजारात आणला आहे. हे आहेत आयफोन १७ चे मॅाडेल Apple च्या AWE Dropping Event मध्ये iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max हे व्हेरिंयट लॅान्च करण्यात आले आहेत. याशिवाय Apple Watch 11 series देखील लॉन्च करण्यात आली आहे. iPhone 17 या मोबाईलला 6.3 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. अॅपलने पहिल्यांदाच बेस मॉडेलमध्ये 120 हर्ट्जचा रिफ्रेश रेट दिला आहे. हे मॅाडेल फास्ट चार्जिंंगला सपोर्ट करणार आहे. अवघ्या 20 मिनिटांत ५० टक्के चार्जिंग होणार आहे, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. कॅमेरा अॅपलने या मॅाडेलमध्ये कॅमेऱ्यातही मोठे बदल केले आहेत. फ्रंट कॅमेरा: 48MP, 12MP 2X टेलिफोटो फ्रंट कॅमेरा: सेंटर स्टेज फ्रंट कॅमेरा, स्क्वेअर सेन्सर प्रत्येक प्रकारे चांगले सेल्फी घेण्यासाठी उपलब्ध असेल. स्लीम मोबाईल हा आतापर्यंतचा सर्वात स्लीम (पातळ) आयफोन आहे, याची फ्रेम टायटन यिमपासून बनलेली असून मागील सर्व आयफोनपेक्षा अधिक टिकाऊ आहे. लूक iPhone 17 लूक iPhone 16 सारखाच आहे. फोनच्या बॅक पॅनेलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, iPhone 17 मध्ये एक्शन बटण देखील आहे. नवीन iPhone 17 मध्ये ब्लॅक, व्हाइट, स्टील ग्रे, लाइट ब्लू, ग्रीन आणि पर्पल रंगातील व्हेरिंयट असणार आहे. iPhone 17 Pro, iPhone 17 max iPhone 17 Pro मध्ये 6.3-इंच डिस्प्ले आहे, तर 17 प्रो मॅक्समध्ये 6.9-इंच सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्जचा रिफ्रेश रेट देतो. या आयफोनमध्ये Apple चा लेटेस्ट आणि टॉप ऑफ द लाइन A 19 प्रो प्रोसेसर आहे. यामध्ये Apple इंटेलिजन्स फीचर्सही मिळणार आहे. कॅमेरा या दोन्ही व्हेरिंयटमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि 48 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आहे. 17 Pro आणि आयफोन 17 Pro मॅक्समधील रॅम आणि बॅटरी क्षमता उघड केलेली नाही. या आयफोनमध्ये यूएसबी 3.0 टाइप सी पोर्ट, 5G वाय-फाय आणि ब्लूटूथ सपोर्ट समाविष्ट आहे. दोन्ही आयफोन धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी IP68 रेटिंगसह सुसज्ज आहेत. किंमत iPhone 17 Pro च्या 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,34,900 रुपये, 512 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,54,900 रुपये आणि 1 TB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,74,900 रुपये आहे. iPhone 17 Pro Max च्या बेस 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,49,900 रुपये, 512 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,69,900 रुपये, 1 TB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,89,900 रुपये आणि 2 TB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2,29,900 रुपये आहे. या iPhone ची प्री-ऑर्डर 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होणार आहे. तर सेल १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हेही वाचा : TMKOC: ७ वर्ष कामाविना भटकले ‘अब्दुल’, पण ‘तारक मेहता…’ने दिला नवा जन्म : शरद सांकला यांचा संघर्ष