अखेर प्रतिक्षा संपली! हाऊसफुल 5 चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; पात्रांच्या करामती पाहून तुम्ही पोट धरून हसाल…

Housefull 5 trailer : हाऊसफुल ५ हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधून या चित्रपटातील कास्ट दाखविण्यात आली आहे. अनेक मोठे कलाकार हाऊसफुल ५ चा मध्ये कॅामेडी करताना दिसणार आहेत यामुळे कॅामेडीचा जोरदार तगडा हाऊसफुलच्या ५ व्या भागात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर तर खळखळून हसायला लावणारा आहे. येत्या ५ जून हाऊसफुल ५ हा चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे.
या चित्रपटात तगडी स्टारकास्ट असल्याने चित्रपटाविषय़ी मोठी उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, आणि जॅकी श्रॉफ यांसारख्या मोठ्या कलाकारांची फौज आहे. हाऊसफुलच्या आधीच्या भागांनी प्रेक्षकांचे मनोरंजन कलेच शिवाय त्यांना खळखळून हसायला भाग पाडले. आता हाऊसफुलच्या पाचव्या भागाची कथा थोडीशी वेगळी असणार आहे. यात मर्डर मिस्ट्रीसोबत कॅामेडीचा तगडा देखील असणार आहे, असे ट्रेलर पाहून दिसत आहे.
या चित्रपटात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, नरगिस फकरी आणि सोनम बाजवा या अभिनेत्रीही दिसणार आहेत. रंजीत डोबरियाल यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने क्रूझवर पार्टी ठेवली आहे. या पार्टीमध्ये त्यांचा खून होता. यानंतर त्यांचा खरा वारसादार कोण? यावरून पैशांच्या हव्यासापोटी चित्रपटातील मुख्य पात्र आपणच खरे वारसदार असल्याचा दावा करतात.
मात्र, हे सर्व घडत असताना अनेक ट्वीस्ट चित्रपटात येत राहतात. हाऊसफुलचा आत्तापर्यंतचा हा 5 वा भाग आहे. पहिला भाग 2010 मध्ये, दुसरा 2012, तिसरा 2016 आणि चौथा भाग 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सर्व भागांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता पाचव्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.




