जी-20 संघटनेच्या परिषदेसाठी लोगोत कमळाचा वापर; ममता बॅनर्जींचा आक्षेप
Updated On:

कोलकाता – जी 20 संघटनेच्या भारतातील परिषदेसाठी जो लोगो तयार करण्यात आला आहे त्यात कमळाचा वापर करण्यात आला आहे. त्या प्रकाराला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला आहे.
केवळ राष्ट्रीय प्रतिक म्हणून कमळाचा वापर केला गेला आहे असा युक्तिवाद भारत सरकारच्यावतीने केला जात आहे. पण देशातल्या अन्यही राष्ट्रीय प्रतिकांचा या लोगोत वापर करण्यात आला असता असे ममतांनी नमूद केले. त
थापी या विषयी आपण फार आक्रमक चर्चा उपस्थित करणार नाही कारण हा आंतरराष्ट्रीय परिषदेचा विषय असल्याने ते देशाच्या प्रतिष्ठेसाठी योग्य ठरणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
या लोगोसाठी सरकारने कमळ चिन्हाचा वापर करून त्या परिषदेचा पक्षीय राजकारणासाठी वापर चालवला आहे असा आक्षेप कॉंग्रेस पक्षानेही घेतला होता.





