आकर्षक झुंबरामुळे विद्यापीठ तेजोमय

ब्रिटिशकालीन झुंबर पुन्हा बसविला

पुणे – तब्बल 148 वर्षांची परंपरा असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वैभवशाली मुख्य इमारतीत ब्रिटिशकालीन झुंबर पुन्हा एकदा बसविण्यात आला आहे. या झुंबरामुळे मुख्य इमारतीचे सभागृह आकर्षक रोषणाईने प्रकाशमय झाले आहे.

पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत इंग्रजांच्या काळात गर्व्हरनरची राहण्यासाठीची इमारत होती. सात वर्षांनंतर या इमारतीचे बांधकाम 1871 रोजी पूर्ण झाले होते. या इमारतीच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आल्याने, तत्कालीन पुण्यातील गर्व्हरनरला इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये विचारणा करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर या इमारतीत 500 पाऊंडाचे झुंबर लावल्यामुळे गर्व्हरनला धारेवर धरण्यात आले होते, असा मुख्य इमारतीचा इतिहास असून, त्याच काळातील झुंबर आता दुरस्तीसह इमारतीत लावण्यात आले आहे. आजमितीला या झुंबराची किंमत दीड कोटीच्या आसपास राहणार असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

बेल्जियन ग्लासेसचा वापर करून हे झुंबर तयार करण्यात आले होते. सद्यस्थितीत अशा प्रकारचे झुंबरे मिळणे दुर्मीळच म्हणावे लागेल. ज्ञानेश्‍वर सभागृहात 3, सरस्वती सभागृहात 8 आणि शिवाजी सभागृहात 3 अशी एकूण 14 झुंबरे पुन्हा एकदा बसविले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×