Rajgad : वाराणसीच्या घाटांचा अनोखा देखावा
Rajgad : तसेच गंगा नदी, घाटाच्या पायऱ्या, होड्या, मंदिरे, पारंपरिक इमारती आणि आकर्षक प्रकाशयोजना यांचा बारकाईने समावेश करण्यात आला आहे.

राजगड : गणेशोत्सवानिमित्त मार्गासनी गावातील संदीप वालगुडे यांनी आपल्या घरी वाराणसीच्या प्रसिद्ध घाटांची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. या देखाव्यातून हिंदू संस्कृती, धार्मिक परंपरा आणि वाराणसीच्या आध्यात्मिक वातावरणाचे सुंदर दर्शन घडत आहे.
यावर्षीच्या गणपती सजावटीसाठी वालगुडे यांनी माणिकर्णिका घाट, दशाश्वमेध घाट, प्रयाग घाट आणि जलासेन घाट यांची प्रतिकृती तयार केली आहे. तसेच गंगा नदी, घाटाच्या पायऱ्या, होड्या, मंदिरे, पारंपरिक इमारती आणि आकर्षक प्रकाशयोजना यांचा बारकाईने समावेश करण्यात आला आहे.
विशेष आकर्षण ठरत आहे ते गंगा आरतीचे दृश्य. घाटावर सुरू असलेली आरती, मंदिरांवरील भगवे ध्वज, नदीतील होड्या आणि प्रकाशयोजनेमुळे संपूर्ण देखाव्याला वाराणसीतील घाटांचे जिवंत स्वरूप प्राप्त झाले आहे. छायाचित्रातील देखाव्यातही घाटांची रचना, नदी, होड्या आणि मंदिरांची मांडणी अतिशय कल्पक पद्धतीने करण्यात आल्याचे दिसून येते.
याबाबत संदीप वालगुडे म्हणाले, यावर्षी आम्ही गणपती सजावटीसाठी वाराणसीच्या प्रसिद्ध घाटांचा देखावा साकारला आहे. या देखाव्यात गंगा नदी, घाटाच्या पायऱ्या, होड्या, मंदिरे, पारंपरिक इमारती आणि घाटावरील प्रकाशयोजना दाखवली आहे. वाराणसीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाची सुंदर अनुभूती लोकांना या देखाव्यातून मिळावी, हा आमचा प्रयत्न आहे.





