Unemployment Rate: बेकारीचा दर झाला कमी
Updated On:

नवी दिल्ली – सप्टेंबर अखेर संपलेल्या तिमाहीत भारतातील बेकारीचा दर कमी होऊन 6.4% या पातळीवर आला असल्याची माहिती सरकारच्या ही आकडेवारी संकलित करणार्या संस्थेने म्हटले आहे. सध्याचा बेकारीचा दर गेल्या वर्षाच्या या तिमाहीतील 6.6% या दरापेक्षा थोडा कमी झाला आहे. महिला वर्गाचा बेकारीचा दर या तिमाहीत कमी होऊन 8.4% इतका झाला आहे.
जो की गेल्या वर्षी या तिमाहीत 8.6% होता. एप्रिल ते जून या कालावधीत महिलांच्या बेकारीचा दर 9% होता. म्हणजे वार्षिक व मासिक पातळीवर महिलांच्या बेकारीचा दर कमी झाला आहे. मात्र पुरुषाच्या तुलनेत महिलांची बेकारी जास्त आहे. या कालावधीत भविष्य निर्वाह निधीत नोंदणी केलेल्या कर्मचार्यांची संख्या ही वाढली आहे.
टॅग्स:





