महुडे : लहान मूल दोनशे वेळा हसते. मात्र, माणसाचे वय जसे वाढते तसे हसणे कमी होते. जे लोक एखाद्याच्या दिव्यांगत्वावर हसतात, तेच खरे अपंग (दिव्यांग) असल्याचे प्रतिपादन प्रसिध्द एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू यांनी केले. भोलावडे (ता. भोर) येथील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन दि. २७ ते २९ डिसेंबर कालावधीत पार पडले. यावेळी व्यासपीठावर भोर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेश राजे पंतसचिव, नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर, उपाध्यक्ष ॲड. मुकुंद तांबेकर, सचिव डॉ. सुरेश गोरेगांवकर, डॉ. प्रदीप पाटील, सुरेश शाह, मधुकर पैठणकर, सुरेश लाळे, प्रफुल्ल आंबेकर, मिलींद शाह, डॉ. विजया पाटील, प्राचार्य लक्ष्मण भांगे आदी उपस्थित होते. यशस्वी होण्यासाठी भावना आणि उत्साह महत्वाचा असून उत्साही लोकांच्या भोवती जग फिरते. हुशार माणूसच प्रगती करतो. जीवणात सकारात्मक विचार करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थांसह उपस्थितांना दिला. मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यासह डॉ. पवन गायकवाड, सुप्रिया धाराशिवकर, पोलीस उपनिरीक्षक सचिन मरगजे, आशिष गुजर, उद्योजक प्रदीप जाधव या माजी विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य एल. एम. भांगे, उपप्राचार्य वसंत गायकवाड, पर्यवेक्षिका निलिमा मोरे, विश्वास निकम, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेडगे, संतोष दळवी, सोमनाथ कुंभार, दिलीप देशमुख, प्रा. व्ही. बी. शिंदे, प्रा. सोमनाथ सोडमिसे, प्रा. दतात्रय शिंदे, प्रा. संजय खुटवड, प्रा. तानाजी लवटे, प्रा. चेतना शिंदे, अनंता शिर्के, केशव पवळे, विनायक धुमाळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विक्रम शिंदे, प्रा. श्रीम. एस. आर. दुधगावकर, श्रीम. वैशाली थोरात यांनी केले. ज्ञानेश्वर शेडगे यांनी आभार मानले.