#IPL2022 | कोट्यावधींचे करारच ठरतात किचकट
Updated On:

मुंबई -आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमासाठीचा लिलाव नुकताच पार पडला. यात अनेक खेळाडूंना कोट्यवधींच्या रकमेत विविध संघांनी खरेदी केले. मात्र, ही रक्कम खरेच पूर्णपणे खेळाडूंना मिळते का, असा सवाल गेली अनेक वर्षे चाहत्यांना पडला होता.
आता त्याचे काहीसे स्वरूप नुकतेच समोर आले आहे. त्यानुसार जी रक्कम बोली लावल्यावर खेळाडूला मिळते असे वाटत होते, त्यात प्रचंड कपात होते व प्रत्यक्ष टेकहोम खूप कमी मिळते व हे कोट्यवधींचे करार किचकटच ठरतात.
- जी बोली खेळाडूवर लागते त्यातून कर कापून घेतला जातो.
- लिलावातील रकमेवर अन्य कोणी दावा करू शकत नाही.
- ही बोली एका मोसमासाठीच असते.
- हा करार तीन वर्षांचा असेल, तर तीनही वर्षे समान रक्कम मिळते.
- 2008 ते 2012 पर्यंत रक्कम अमेरिकी डॉलरमध्ये मिळत होती.
- 2012 नंतर भारतीय रुपयांत दिली जाते.
- खेळाडू रिटेन करायचा असेल तर करार वाढू शकतो.
- खेळाडू पूर्ण मोसम खेळला तरच संपूर्ण रक्कम मिळते.
- खेळाडू किती सामने खेळतो यावरही रक्कम अवलंबून असते.
- खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास तर पैसे मिळत नाहीत.
- खेळाडूला उपलब्धतेनुसार मानधन दिले जाते.
- स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीचा खर्च संघ करतो.
- 15-65-20 टक्केअशा तीन टप्प्यात खेळाडूला रक्कम मिळते.
- 15 टक्केरक्कम ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, 65 टक्के रक्कम स्पर्धा सुरू असताना आणि 20 टक्के रक्कम स्पर्धा संपल्यावर मिळते.
टॅग्स:





