‘ट्रबल शूट’ हेल्पलाइन आजपासून सुरू

हेल्पलाइन नंबर : 020-25502114
पुणे – लसीसंदर्भातील सरकारी आणि खासगी दवाखन्यात अडचणी आल्यास त्या सोडविण्यासाठी महापालिकेने “ट्रबल शूट’ ही हेल्पलाइन सुरू केली असून, आजपासून (शुक्रवार) ती कार्यान्वित केली जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याविषयी माहिती दिली.
सरकारी आणि खासगी दवाखान्यातील नर्स, साइट मॅनेजर आणि इन्चार्ज डॉक्टरांना लसीकरण करताना कोविन सॉफ्टवेअरमध्ये काही अडचण आल्यास त्यांनी हेल्पलाइनवर कॉल करावा. कोविड लसीकरण करताना प्रमाणपत्राबद्दल काही अडचण आल्यास नर्स, साइट मॅनेजर आणि इन्चार्ज डॉक्टर यांनीच या हेल्पलाइनवर फोन करावा.
याशिवाय को-विन सॉफ्टवेअरला काही तांत्रिक अडचण आल्यास हेल्पलाइनवर संपर्क करावा, असा नियम यासाठी केला आहे. सर्वसामान्यांसाठी या हेल्पलाइनवर दैनंदिन लसीकरण सत्र कोठे सुरू आहे याची माहिती मिळणार आहे. ही हेल्पलाइन सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे.





