कोयनानगर (वार्ताहर ) : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाकरीता पाटण तालुक्यातील वाटोळे येथे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारायला शासनाने मान्यता दिली आहे. या प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम करण्यासाठी शासनाने ९३.३४ कोटी रुपये मान्यता दिली आहे. या प्रशिक्षण केंद्रास लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नाव देऊन त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला आहे.
राज्याच्या विकासासाठी शासनाला महसुलाची आवश्यकता असून महसूल उभारणीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे विभागाच्या सक्षमतेसाठी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणे गरचेजे आहे. उत्पादन शुल्क विभागाचे प्रशिक्षण केंद्र सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील वाटोळे येथे प्रशिक्षण केंद्र उभे करायला शासनाने मान्यता दिली आहे.
उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी घेतलेल्या पुढाकाराने निसर्गरम्य परिसरात हे प्रशिक्षण केंद्र उभे राहत आहेत. या केंद्राचे बांधकाम करायला शासनाने ९३.३४ कोटी रुपये वित्तीय तरतुद केली आहे. १३ मार्च २०२४ रोजी या केंद्राला मान्यता दिली आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्यासाठी विकासासाठी दिलेले योगदानामुळे या प्रशिक्षण केंद्रास लोकनेते बाळासाहेब देसाई असे नामांतर करण्याला शासनाने मान्यता दिली आहे.२९ सप्टेंबर रोजी या प्रशिक्षण केंद्राचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे.उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.