रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीजचा मार्ग मोकळा
Ranveer Singh | बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचा पहिला लूक समोर आल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजचा मार्गही मोकळा झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे.
‘धुरंधर’चा ट्रेलर २२ ऑगस्ट रोजी सेन्सॉर बोर्डाला दाखवण्यात आला. त्यानंतर CBFC कडून ट्रेलरला U/A सर्टिफिकेट मिळालं आहे. सीबीएफसी वेबसाईटनुसार, हा ट्रेलर २ मिनिट ४२ सेकंदांचा आहे. अद्याप मेकर्सने ट्रेलरच्या रिलीज डेटची घोषणा केलेली नाही. मात्र लवकरच ट्रेलर प्रेक्षकांना पाहता येणार असल्याची शक्यता आहे.
‘धुरंधर’चा फर्स्ट लूक रणवीर सिंहच्या वाढदिवशी ६ जुलै रोजी आला होता. आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटात रणवीर सिंहने यामध्ये सीक्रेट एजंटची भूमिका साकारली आहे. पाकिस्तानात राहून तो दहशतवाद्यांशी दोन हात करताना दिसणार आहे. Ranveer Singh |
यातील रणवीर आणि संजय दत्तच्या लूकने देखील लक्ष वेधलं आहे. या चित्रपटात संजय दत्तसह आर. माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन यांसारखे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ‘धुरंधर’ ५ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. Ranveer Singh |
हेही वाचा:





