11 जणांना ठार करणारी वाघीण अखेर जेरबंद
Updated On:

चंद्रपूर : जिल्ह्यातील चिचपल्ली वनक्षेत्रात तीन वर्षांत 11 जणांना मारणाऱ्या वाघिणीला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. वाघीण टी-83 ला जनाला भागात एका शूटरने बेशुद्ध केले. त्यानंतर या वाघिणीला पिंजऱ्यात बंद करण्यात आले. आधीही तिला पकडण्याचे प्रयत्न झाले होते.
परंतु ती पळाली होती. त्यात तिने अनेकदा स्थानिकांवर हल्ला केल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शोधमोहिम राबवली जात होती. अखेर या वाघिणीला जेरबंद केल्यानंतर स्थानिकांनी आता सुटकेचा निश्वास टाकला आहे.





