Satara : पुसेगावात आज रंगणार श्वान शर्यतीचा थरार

पुसेगाव : श्री सेवागिरी महाराज यांच्या ७७ व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे गुरुवार दि. २ रोजी सकाळी दहा वाजता भव्य श्वान शर्यती आहेत.
रसिकप्रेमींनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांनी केले आहे.
शर्यतीच्या दिवशी सकाळी दहा वाजता मैदानावर लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे लॉट पाडले जातील. सर्व श्वानांना मास्क वापरणे आवश्यक आहे. श्वान शर्यती महाराष्ट्र ग्रेहाऊंड असोसिएशनच्या नियमानुसार होतील श्वान शर्यतीचे यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण होईल.
शर्यतीस पुसेगाव पॅटर्न डॉग रेस नुसार नर गटाने शर्यतीस प्रारंभ होईल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब उर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव विशेष परिश्रम घेत आहेत.





