रुग्णवाढीचा वेग 20 प्रभागांत सर्वाधिक
पुणे – लॉकडाऊन शिथिल झाल्याच्या महिन्याभरानंतर शहरातील 20 प्रभागांमध्ये करोना रुग्णवाढीचा वेग सर्वाधिक आहे. त्यात, बहुतांश प्रभाग उपनगरांतील असून 20 मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांमधील सहा गावांचाही समावेश आहे. या प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 14 दिवसांपेक्षा कमी आहे. त्यामुळे करोना साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत.
शहरात एप्रिल आणि मे महिन्यांत करोनाचे रुग्ण प्रामुख्याने मध्यवस्तीत सापडत होते. मात्र, जून महिन्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर प्रसार उपनगरांत वेगाने वाढला. त्यात सर्वाधिक रुग्णवाढ 20 प्रभागांत आहे. यात सुमारे 11 प्रभागांमध्ये 10 दिवसांत रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे, तर 9 प्रभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 14 दिवसांचा आहे.
प्रभाग आणि रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी
प्रभाग 42 शिवणे (उत्तमनगर) – 6.40 दिवस, प्रभाग 33 (वडगाव बुद्रुक) – 6.55 दिवस, प्रभाग 42 (आंबेगाव खुर्द) – 7.91 दिवस, प्रभाग 42 (धायरी) – 8.79 दिवस, प्रभाग 42 (शिवणे) – 8.84 दिवस, प्रभाग 12 (मयूर कॉलनी) – 9.11 दिवस, प्रभाग 43 (सनसिटी) – 9.27 दिवस, प्रभाग 31 (कर्वेनगर) – 9.30 दिवस, प्रभाग 9 (बाणेर) – 9.39 दिवस, प्रभाग 40 (आंबेगाव- दत्तनगर) – 9.43 दिवस, प्रभाग प्रभाग 10 (बावधन- कोथरूड) – 9.66 दिवस, प्रभाग 1 कळस-धानोरी – 10.24 दिवस, प्रभाग 39 धनकवडी (आंबेगाव पठार) – 10.42 दिवस, प्रभाग 32 (वारजे- माळवाडी) – 11.23 दिवस, प्रभाग 26 महंमदवाडी- कौसरबाग – 12.31 दिवस, प्रभाग 4 – खराडी- चंदननगर – 12.72 दिवस, प्रभाग 42 (फुरसुंगी) – 13.15 दिवस प्रभाग 42 (उंड्री) 13.19 दिवस, प्रभाग 13 (एरंडवणा-हॅपी कॉलनी) – 13.27 दिवस, प्रभाग 41 (कोंढवा-येवलेवाडी) – 13.98 दिवस.