मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचे ४ वाजून ३४ मिनिटांनी विसर्जन
Updated On:

GaneshVisarjan 2025 | पुण्यातील मानाचा पहिला कसबा आणि मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक ठरलेल्या वेळेआधी अलका चौकात पोहचल्याबद्दल पोलीस आणि प्रशासनाकडून त्यांच अभिनंदन करण्यात आलं. यावेळी पुण्यात विसर्जन मिरवणूकीच्या वेळेवरुन बरीच चर्चा पहायला मिळत होती.
मात्र ग्रामदैवत कसबा आणि ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी यांनी वेळ पाळल्याबद्दल त्यांच कौतुक होत आहे. काही वेळापूर्वीच मानाच्या पहिल्या दोन गणपतीचे विसर्जन झाले आहे. यानंतर आता मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचे ४ वाजून ३४ मिनिटांनी विसर्जन देखील झाले आहे. GaneshVisarjan 2025 |





