Anupam Kher : “राम मंदिरातली चोरी क्षुल्लक गोष्ट, मुघलांनी तर…” अनुपम खेर ट्रोलर्सच्या निशाण्यावर
Anupam Kher : अनुपम खेर यांचे व्हिडिओच्या माध्यमातून ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर

Anupam Kher : बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणी एक विधान केले होते. ज्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. एका मुलाखतीदरम्यान अनुपम खेर यांनी राम मंदिरातील देणगी चोरीचे प्रकरण ही खूप छोटी गोष्ट असल्याचे म्हंटले. (Anupam Kher)
“मंदिरांमध्ये लूट तेव्हा झाली होती, जेव्हा मुघलांनी आमची मंदिरे तोडली. जेव्हा ब्राह्मणांची हत्या करण्यात आली. जेव्हा मंदिरांमधील धन लुटून नेले आणि महिलांवर अत्याचार झाले, ती खूप मोठी आणि भयानक गोष्ट होती. जर आपण त्या दुःखातून बाहेर पडू शकतो, तर ही (चोरीची घटना) खूप छोटी गोष्ट आहे,” असे अनुपम खेर यांनी सांगितले. (Anupam Kher)
या वक्तव्यादरम्यान त्यांनी कथितरीत्या मुघल काळातील हिंदूंवरील अत्याचारांची तुलना या चोरीच्या घटनेशी केल्याचं समोर आल्याने नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. (Anupam Kher)
आता या ट्रोलिंगच्या दरम्यान, अनुपम खेर (Anupam Kher ) यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “प्रामाणिक व्यक्तीची सर्वात मोठी संपत्ती त्याची निडरता असते. ज्याच्या मनात चोर नसतो, त्याची नजर कधीच झुकत नाही.”
View this post on Instagram
यानंतर अनुपम खेर यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर करत म्हंटले, “मी कोणालाही खूश करण्यासाठी बोलत नाहीत. मी नेहमीच निडरपणे बोलतो, कारण मी प्रत्येकाला खूश करण्याचा प्रयत्न करत नाही. मी हे शिकलो आहे की स्वतःच्या नजरेत चांगली व्यक्ती राहणे महत्त्वाचे आहे. बाकी जगाचे मत वेळेनुसार बदलत राहते. (Anupam Kher)
तुमच्या जगात असे किती लोक आहेत, ज्यांचे मत खरोखरच महत्त्वाचे आहे? कधीतरी याचा विचार करा. पूर्ण जगात पॉप्युलर बनण्याचा प्रयत्न करू नका. हे आवश्यकही नाही आणि योग्यही नाही. जय हो,” याद्वारे अनुपम खेर यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिल्याचे म्हंटले जात आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अनुपम खेर लवकरच ‘खोसला का घोसला २’ मध्ये दिसणार आहेत. (Anupam Kher)
काय आहे नेमकं प्रकरण? (Anupam Kher)
अयोध्येथील श्रीराम मंदिरातील दानपेटीतून लाखो रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. दानपेटीतील पैसे मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कपड्यांमध्ये आणि शूजमध्ये नोटांचे बंडल लपवल्याचे समोर आले. एसआयटीच्या प्राथमिक तपासानंतर आतापर्यंत सुमारे ७८ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारच्या विशेष तपास पथकानं कारवाई करत काही आरोपींना अटकही केली आहे.
हेही वाचा:
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजने’तील मोठी अपडेट समोर! तब्बल 92 लाख महिलांचा हप्ता बंद





