Sanjay Raut | आगामी विधानसभा निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून देखील जागा वाटपाबाबतच्या चर्चा सुरू आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात ठाकरे-२ सरकार येणार असल्याचा मोठा दावा केला आहे.
‘खोके सरकार घालवायचे’ Sanjay Raut |
विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये नाही तर नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रातील 14 महापालिकेच्या निवडणुका बाकी आहेत, ते निवडणुका घ्यायला घाबरत आहेत. लोकसभा निवडणूक घेतली कारण जगात नाचक्की झाली असती. तारीख मॅनेज करायला ते नक्कीच प्रयत्न करतील. मात्र, त्यांना निवडणूक वेळेवरच घ्यावा लागतील. निवडणूक वेळेवर व्हायलाच पाहिजे. खोके सरकार आम्हाला घालवायचे आहे. Sanjay Raut |
‘राज्यात ठाकरे-२ सरकार येणार’ Sanjay Raut |
“महायुतीला लोकसभेचा सर्व्हेही अनुकूल नव्हता आणि विधानसभेचाही नाही. आम्हाला कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. कोणत्याही परिस्थितीत राज्यात ठाकरे-२ सरकार येणार, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणार, हे कोणीही थांबवू शकत नाही. मग त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर कितीही घोषणा करू द्या. कितीही योजना आणा, पैशांचा धुरळा उडवा, मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करा. पण निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतील”, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. Sanjay Raut |
“अजित पवार हे स्वतः बारामतीत पराभूत होतील. त्यांच्या लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करतील. महाराष्ट्रातील सर्व गद्दार आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत. राज्यातील लाडक्या बहिणी त्यांचा पराभव करतील. आमदारांना ५० कोटी, खासदारांना १०० कोटी तर नगरसेवकांची किंमत ५ कोटी आणि आमच्या लाडक्या बहिणींसाठी १५०० रुपये देता का? मते दिली नाहीत तर पैसे परत घेण्याची भाषा करतात”, असा महायुतीचा समाचार देखील संजय राऊत यांनी घेतला.
हेही वाचा :
मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप; पोलिस यंत्रणा सतर्क