वाघोलीत चार ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेची यंत्रणा कार्यान्वित

वाघोली (प्रतिनिधी) : वाघोलीतील सार्वजनिक गणेशोत्सव व घरगुती गणपतींच्या मूर्तींचे विसर्जनास सुरुवात होणार असून पाचव्या, सहाव्या, सातव्या, नवव्या, दहाव्या, अकराव्या दिवशीच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी वाघोलीत वाघेश्वर मंदिर, बीजेएस कॉलेज, गणेशनगर (प्रभू श्रीराम गार्डन), भैरवनाथ तळे या ठिकाणी महानगरपालिकेची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. यावर्षी फिरत्या हौदाची सोय महापालिकेकडून करण्यात आली नसल्याने याच ठिकाणी नागरिकांनी गणेश मुर्त्यांचे विसर्जन करावे लागणार आहे.
वाघेश्वर मंदिरावर गणेश मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांचा अधिक कल असल्यामुळे येथील विसर्जन हौदावर ताण येत असून नागरिकांची अन्य ठिकाणी देखील विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. वाघोलीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह व घरगुती गणपतींचे विसर्जन प्रामुख्याने पाचव्या, सातव्या, नवव्या, दहाव्या दिवशी होत असल्यामुळे गणेश मूर्ती विसर्जन करताना नागरिकांना अडचणी येऊ नये म्हणून महानगरपालिकेच्यावतीने चार ठिकाणी विसर्जन हौद व मूर्ती संकलनाची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे निर्माल्य गोळा करण्याची सोय देखील केली आहे.
पुणे महानगर पालिकेच्या वतीने विसर्जनासाठी वाघोली येथील बीजेएस कॉलेज, गणेश नगर (प्रभू श्रीराम उद्यान), भैरवनाथ तळे, वाघेश्वर मंदिर याठिकाणी नागरिकांना गणेश मूर्तींचे विसर्जन व संकलन/दान करता येईल.
रामभाऊ दाभाडे
(माजी सदस्य जिल्हा परिषद पुणे)





