ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप इंडोनेशियाच्या दौऱ्यावर

जकार्ता, (इंडोनेशिया) : ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस हे इंडोनेशियाच्या दौऱ्यावर असून तेथे त्यांनी जनतेला सौहार्द आणि वैविध्यतेतील सुसंवादाचे वचन पाळण्याचे आणि धार्मिक कट्टरतावाला विरोध करण्याचे आवाहन केले. पोप यांनी आशिया खंडातील चार देशांच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात केली. ते ११ दिवस या दौऱ्यावर असणार असून प्रकृती साथ देत नसल्याने त्यांना या दौऱ्याचा ताण जाणवण्याचीही शक्यता आहे.
पोप यांनी इंडोनेसियाच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मावळते अध्यक्ष जोको विदोदो आणि अन्य महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची अध्यक्षांच्या राजवाड्यामध्ये यांची भेट घेतली. त्यानंतर इंडोनेशियातील प्रमुख धर्मगुरू, भिक्षुणी आणि दार्मिक व्याख्यात्यांच्याही भेटी घेतल्या. इंडोनेशियाच्या १७ हजार द्विपसमूहावरील मानवी वैविध्यतेची तुलना त्यांनी केली. या प्रत्येकाची एक विशेषता आहे. यातील प्रत्येक ओळख स्वतंत्र आणि आपल्या ठिकाणी अपरिवर्तनीय आहे. तरीही या स्वतंत्र ओळखीमुळेच संघर्ष होऊ शकतात, असेही पोप म्हणाले. अलिकडच्या काही वर्षांमध्ये जगात काही ठिकाणी असहिष्णूतेमुळे संघर्षाच्या घटना घडत असल्याच्या संदर्भाने ते बोलत होते.
वैविध्यपूर्ण संस्कृती, वैचारिक आवृत्यांमधील समतोल साधला गेला पाहिजे. एकता जपणाऱ्या विचारांना जोपासले गेले पाहिजे. राजकीय नेत्यांना एक विशिष्ट भूमिका पार पाडावी लागते. मा६ आंतरधार्मिक संवाद वाढवला जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी अध्यक्ष विदोदो यांना दिली.आपल्यापुढे समान आव्हाने नेहमीच असणार आहेत. त्यातील एक आव्हान कट्टरतावाद आणि असहिष्णूतेचे आहे. धर्माची विकृती करून हिंसाचार, फसवणूक करून आपले कट्टरवादी आणि असहिष्णू विचार इतरांवर लादले जातात, असे पोप म्हणाले.
अलिकडेच म्यानमारमधून ७ लाख रोहिंग्यांना बांगलादेसात परागंदा व्हायला लागले आहे. बांगालादेशसह इतर अनेक देशांमध्ये या रोहिंग्यांनी आश्रय घेतल्याचे पोप यांनी नमूद केले. इंजोनेसियात आश्रय घेतलेल्या रोहिंग्यांची त्यांनी भेट देखील घेतली. पोप फ्रान्सिस यांनी फार पूर्वीपासून पॅलेस्टिनींना पाठिंबा दिला असून इस्रायलच्या आक्रमणावर टीका केली आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष विदोदो यांनी पॅलेस्टिनींना दिलेल्या पाठिंब्याबद्दल पोप फ्रान्सिस यांना दन्यवाद दिले आहेत.
१३ सप्टेंबपर्यंत ४ देशांचा प्रवास
पोप फ्रान्सिस हे ११ दिवसात इंडोनेशिया, पापुआ न्यू गिनी, इस्ट तिमूर आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते तब्बल ३२ हजार ८४१ किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. पोप यांनी आतापर्यंत क्वचितच इतक्या कमी कालावधीमध्ये इतक्या लांब अंतराचा प्रवास केला आहे.





