पुणे | आरटीओच्या मोटार वाहन कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही संप सुरुच
Updated On:

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी राज्याचे परिवहन आयुक्त हे चर्चेला बोलवतील आणि त्रस्त कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून न्याय देतील अशी अपेक्षा होती.
मात्र, कोणत्याही प्रकारचा चर्चेसाठी निमंत्रण परिवहन आयुक्त कार्यालयाकडून दिलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला असून, उद्या गुरुवारी (दि. २६) देखील संप सुरू राहणार आहे, असे संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने (शासन मान्यताप्राप्त) आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी संपात राज्यातील हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्रातून दुसऱ्या दिवशीही बेमुदत संप सुरुच होता. परिणामी आरटीओची सेवा संपूर्ण राज्यात ठप्प झालेली आहे. कर्मचाऱ्यांच्या संपाला अराजपत्रित वर्ग दोन या संघटनेने पाठिंबा दिलेला आहे.





