तब्बल साडेचार अब्ज वर्षांपूर्वीचा दगड सापडला

पॅरिस- दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या सहारा वाळवंटात शास्त्रज्ञांना तब्बल साडेचार अब्ज वर्षांपूर्वीचा दगड सापडला आहे. या दगड एका उल्कापिंडाचा हिस्सा असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या दगडाला शास्त्रज्ञांनी इसी ००२ असे नाव दिले असून आतापर्यंत सापडलेला हा सर्वात पुरातन दगड आहे.
एखाद्या ग्रहाचा हा हिस्सा असावा असेही मानले जात आहे. अंतराळात फिरत असताना पृथ्वीच्या गुरत्वकर्षणामुळे तो पृथीववर आदळला असावा या दगडाचे वय पृथ्वीच्या वयापेक्षा जास्त आहे. म्हणजेच पृथ्वीच्या निर्मितीपूर्वी हा दगड अंतराळात फिरत होता पण तो पृथ्वीवर कधी पडला याचे उत्तर शास्त्रज्ञांना मिळत नाही ते शोधण्याचा प्रयत्न सुरु आहेत.
सध्याच्या सौरमंडळाची निर्मिती कशी झाली याचा अजून शोध घेण्यासाठी हा दगड महत्वाचा ठरणार आहे. मॅग्नेशियम आणि ऍल्युमिनिअम तपासणीच्या माध्यमातून या दगडाचे वय साडेचार अब्ज ठरवण्यात आले आहे.





