राज्यात दिवसभरात 224 करोना रुग्णांची नोंद
Updated On:

मुंबई – देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यात नवीन करोनाबाधीतांची संख्या नियंत्रणात असल्याने राज्यात दिलासादायक चित्र आहे. राज्यात शनिवारच्या तुलनेत आज करोनाच्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट झाली आहे.
राज्यात आज 224 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली असून 196 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.11 टक्क्यांवर पोहोचले आहे.
राज्यात आज एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 77,30,127 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 8,03,79,421 करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत करोनाबाधितांची एकूण संख्या ही 78,79,278 इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 1304 इतकी आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 815 रुग्ण हे मुंबईतील आहेत.





