‘स्टेज खचला! संकेत कळला?’; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला

Ashish Shelar | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभांचा धुराळा उडणार आहे. 16 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांची ठाण्यात सभा होती. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाल्यानंतर ते कार्यकर्त्यांशी भेटत असताना स्टेजच्या काही भाग अचानक खचला. त्यानंतर प्रसंगावधान राखून स्टेजवरील उद्धव ठाकरे आणि इतर लोकांना खाली उतरवण्यात आले.
सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
स्टेज खचला! संकेत कळला?
जनता जेव्हा होती कोरोनात तडफडत
हे सगळे बसले होते नातेवाईकांना कंत्राटे वाटत
रिक्षा, टँक्सी, फेरिवाल्या ना दिला एक रुपया
ना आठवण झाली कधी लाडक्या बहिणींची
घरे भरली स्वतःची, दारुवाले आणि बिल्डरांचीनुसते सावत्र नाही हे भाऊ तर आहेत भलतेच लबाड
अडिच वर्षात…— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 17, 2024
आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. “स्टेज खचला! संकेत कळला? जनता जेव्हा होती कोरोनात तडफडत, हे सगळे बसले होते नातेवाईकांना कंत्राटे वाटत. रिक्षा, टँक्सी, फेरिवाल्यांना दिला एक रुपया. ना आठवण झाली कधी लाडक्या बहिणींची, घरे भरली स्वतःची, दारुवाले आणि बिल्डरांची. नुसते सावत्र नाही हे भाऊ तर आहेत भलतेच लबाड, अडीच वर्षात लुटले खूप मोठे घबाड. त्यांचे एक टोक होते १०० कोटीची ती वसूली, या कफन चोरांना लाज नाही कसली.”
“काल उबाठा सेनेच्या सभेचा स्टेज ठाण्यात खचला, यांच्या प्रत्येक पराभवाचा इतिहास ठाण्यानेच तर रचला! यांच्या भाषणांचा प्रभाव पाहा किती? भाषण संपताच खचते पायाखालची माती!!” असं आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा :
मोदी म्हणाले, “बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा” ; आता थेट राहुल गांधी ट्विट करत म्हणाले,”…




