“लोकशाही वाचवा’ कार्यक्रम सुरु असताना स्टेज कोसळला; काॅंग्रेसचे दोन आमदार जखमी
Updated On:

बिलासपूर – छत्तीसगडमधील बिलासपूर येथे कॉंग्रेसच्या वतीने आयोजित “लोकशाही वाचवा’ कार्यक्रमावेळी स्टेज कोसळण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कॉंग्रेसच्या दोन आमदारांसह काही नेते किरकोळ जखमी झाले आहे.
कॉंग्रेसकडून देशभरात अनेक राज्यांमध्ये “लोकशाही वाचवा’ मशाल रॅली काढण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगडमधील बिलासपूर येथे “लोकशाही वाचवा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मशाल रॅली संपल्यानंतर कॉंग्रेस नेते त्याठिकाणी जमलेल्या जनतेला स्टेजवरून संबोधित करत होते.
मात्र स्टेजवर कॉंग्रेस नेत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे स्टेज अचानक कोसळला आणि यात काही नेत्यांना किरकोळ जखमा आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्टेज कोसळण्याचा व्हिडिओही समोर आला आहे. यावेळी कॉंग्रेस नेते मोठ्याने घोषणा देताना दिसत आहेत.





