वाई येथील चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व डॉ. शंतनु अभ्यंकर यांचे निधन
Updated On:

वाई : येथील प्रतिथयश डॉक्टर, लेखक – कवी, अनुवादक, वक्ते, कथाकार, विज्ञान लेखक, नाट्यकर्मी, लो. टिळक स्मारक संस्थेचे अध्यक्ष याशिवाय अनेक संस्थांमध्ये कार्यरत असणारे असे उत्तुंग बहुआयामी व्यक्तिमत्व डॉ. शंतनु अभ्यंकर यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे.
ज्या ताकदीने गेली दोन वर्ष त्यांनी असाध्य आजाराला खंबीरपणे तोंड दिले आणि अत्यंत शांतपणे परिस्थितीला सामोरे गेले त्याला सलाम आहे. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते म्हणून ते ओळखले जात असतं. एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय, साहित्य यांसह विविध क्षेत्रांत हळहळ व्यक्त होत आहे.





