Phaltan: दिवाळीच्या सणावर दुष्काळाचे सावट
Phaltan दिवाळीत लावण्यात येणार्या पारंपरिक पणत्या आणि दिव्यांचेदेखील विविध प्रकार यंदा बाजारात उपलब्ध आहेत. पूजेसाठी लागणारे झाडू, शिराई, बत्तासे, करदोडे, लक्ष्मी मातेची मूर्ती यांचेदेखील दुकाने लावण्यात आली आहेत.

Phaltan: सणानिमित्त बाजारपेठ सजली परंतु यंदाच्या वर्षी दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट असल्याने त्याचे परिणाम बाजारपेठेवर जाणवत आहेत. दुष्काळाचे सावट, वाढलेली महागाई, वाढलेली बेरोजगारी, ऑनलाइन शॉपिंगला वाढलेली ग्राहकांची पसंती त्यामुळे ग्राहकांचा बाजारपेठेत खरेदीसाठी अल्पप्रतिसाद मिळत आहे.
बाजारामध्ये विविध प्रकारचे दुकाने लावण्यात आलेली आहेत. त्यामध्ये कपडे, फराळ, कंदील, पणत्या, रांगोळी आणि विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू, घरगुती पदार्थ, अनेक महिलांनी घरी बनवलेल्या वस्तू अशा अनेक गोष्टी बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या आहेत. दिवाळीसाठी लागणार्या आकाशकंदीलचे विविध प्रकार बघायला मिळत आहे, हाताने बनवलेल्या आकाशकंदिलांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. घरावर लावण्यासाठी विद्युतमाळा, आर्टिफिशियल फुलांचे तोरण यांचे विविध प्रकार उपलब्ध आहे.
दिवाळीत लावण्यात येणार्या पारंपरिक पणत्या आणि दिव्यांचेदेखील विविध प्रकार यंदा बाजारात उपलब्ध आहेत. पूजेसाठी लागणारे झाडू, शिराई, बत्तासे, करदोडे, लक्ष्मी मातेची मूर्ती यांचेदेखील दुकाने लावण्यात आली आहेत.
दिवाळीमध्ये नवीन कपडे खरेदीसाठी ग्राहक मोठी गर्दी करत असतात. यासाठी अनेक कापड दुकानांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कपड्यांच्या विविध प्रकारांबरोबर विविध प्रकारच्या सूट देऊ ग्राहकांना आकर्षित करण्यात येत आहे. दिवाळी सणानिमित्त बाजारपेठ सजली परंतु यंदाच्या वर्षी दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट असल्याने त्याचे परिणाम बाजारपेठेवर जाणवत आहेत.





