‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्रीला लागली हळद; हटके लुकने वेधले चाहत्यांचे लक्ष !

Titeeksha tawde : सिनेइंस्ट्रीत यावर्षी अनेक जोड्या विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतेच अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजाचा लग्नसोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला. त्यानंतर आता अभिनेत्री पूजा सावंत देखील लग्नबंधनात अडकणार आहे. याबरोबरच आता तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेही विवाहबंधनात अडकणार आहेत. तितीक्षा आणि सिद्धार्थने गुपचुप साखरपुडा उरकल्यानंतर आता ही जोडी विवाह करण्यास सज्ज झाली आहे.
तितीक्षा आणि सिद्धार्थने कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत २५ फेब्रुवारीला साखरपुडा केला. त्यानंतर आता तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकताच त्यांचा हळदी समारंभही पार पडला. याचे फोटो समोर आले आहेत. तितीक्षाने हळदीसाठी पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. तर सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता. त्यांच्या लग्नातील खास क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सिद्धार्थने हळदी समारंभात वडिलांबरोबर खास डान्सही केला. याचा व्हिडिओही समोर आला आहे.
View this post on Instagram
तितीक्षा-सिद्धार्थच्या हळदीला रसिका सुनील आणि ऋतुजा बागवेसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. आज २६ फेब्रुवारीला तितीक्षा आणि सिद्धार्थ लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तितीक्षा तावडेने पोस्ट शेअर करत अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांचे केळवणाचे फोटो देखील व्हायरल झाले होते.
अभिनेता सिद्धार्थ बोडके -तितीक्षा तावडेने ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. तितीक्षाने ‘कन्यादान’, ‘तू अशी जवळी रहा’, ‘सरस्वती’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याशिवाय सिद्धार्थ बोडके ‘दृश्यम २’ या बॉलीवूड चित्रपटात व नुकताच ‘श्रीदेवी प्रसन्न’मध्ये झळकला होता.





