‘तू चाल पुढं’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्री दीपा परबने शेअर केली भावूक पोस्ट

Entertainment : अभिनेत्री दीपा परब-चौधरी ‘तू चाल पुढं’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. मात्र या मालिकेला प्रेक्षकांचा फार प्रतिसाद मिळू शकला नाही. या मालिकेचा टीआरपी घसरल्यामुळे ‘झी मराठी’ वाहिनीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यादरम्यान दीपा भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
दीपा परब-चौधरीने या मालिकेच्या सेटवरचा पहिल्या दिवसाच्या शूटिंगचा व्हिडीओ व शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने “’तू चाल पुढं’च्या ह्या सेटवरील पहिला दिवस आणि शेवटचा दिवस नेहमीच मनात घर करून राहील”, अशी कॅप्शनही दिली आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काही प्रेक्षकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
येत्या 13 जानेवारीला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री धनश्री काडगांवकरने सोशल मीडियावर ‘शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ’ असे म्हणत एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओनंतर ‘तू चाल पुढं’ मालिकाही संपणार असल्याचे समोर आले होते. या मालिकेत दीपा परब-चौधरीसह आदित्य वैद्य, धनश्री काडगांवकर, देवेंद्र दोडके आणि प्रतिभा गोरेगावकर हे कलाकार देखील होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये झी मराठीवरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यातच आता ‘तू चाल पुढं’ या मालिकेचाही समावेश झाला आहे.





