चित्रपट थिएटरमध्ये सुरू असताना दुसऱ्या भागाची घोषणा; जाट अॅान न्यू मिशन म्हणत सनी देओलने शेअर केली पोस्ट

Jaat 2 | अभिनेता सनी देओल आणि रणदिप हुडा यांची मुख्य भूमिका असलेला जाट चित्रपटाला बॅाक्स अॅफिसवर चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रिलीजच्या आठवड्याभरात जाटने ५० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. सनी देओलची अॅक्शन प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये खेचून आणत आहे. याशिवाय खलनालयकाच्या भूमिकेत असलेल्या रणदीपला पाहण्यासाठी देखील प्रेक्षक थिएटरमध्ये जात आहेत. यातच आता जाट २ ची चर्चा सुरू झाली असून, खुद्द सनी देओलने याविषयी माहिती देत जाट २ ची अनाउन्समेट केली आहे.
जाट २ चे एक पोस्टर शेअर करत पुढच्या भागाची घोषणा त्याने केली आहे. ही पोस्ट सनीने त्याच्या एक्स अकाउटवरुन शेअर केली असून पोस्टरच्या कॅप्शनमध्ये जॅाट अॅान न्यू मिशल असे लिहिले आहे. यामुळे आठवड्याभरापूर्वीच रिलीज झालेला जाट चित्रपट अजून थिएटर्समध्ये सुरू असताना चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. जाटमधून पहिल्यांदाच सनी देओल आणि रणदीप हुडा यांनी एकमेकांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. यामुळे दोघांच्या अभिनयाला आणि चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मात्र, काही कारणामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
#Jaat on to a New Mission!#Jaat2 💥@megopichand @MythriOfficial @peoplemediafcy pic.twitter.com/LNt1nSek00
— Sunny Deol (@iamsunnydeol) April 17, 2025
तो एक सीन अन्…
चित्रपटातील एका सीनमुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. चर्चमधील सीनमुळे वाद उफाळून आला होता. यामुळे ख्रिश्चन समुदायातील नागरिकांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. ठिकठिकाणी या समूदायाकडून निर्दर्शने करण्यात आली होती. रणदीप हुडा याच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.





