सेल्समनला लागली तब्बल सात कोटीची लॉटरी

दुबई : दुबईमधील एका खाजगी कंपनीत सेल्समनचे काम करणाऱ्या 33 वर्षे वयाच्या भारतीय नागरिकाला तब्बल सात कोटीची लॉटरी लागल्याने त्याचे नशीबच उजळून निघाले आहे. “उपर वाला जब भी देता है तो छप्पर फाडके देता है” ही म्हण त्याच्यासाठी खरी ठरली आहे.
सूनिल्कुमार कचोरिया असे या भारतीयाचे नाव असून तो एका खाजगी कंपनीत सेल्समनचे काम करतो. त्याने ऑक्टोबर महिन्यात लॉटरी चे तिकीट काढले होते. त्या तिकिटावर त्याला 10 लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच सात कोटी रुपयांचे बक्षीस लागले.
पीडीएफ मिलेनियम मिलेनियर नावाच्या या लॉटरीमध्ये दहा लाख डॉलरचे बक्षीस मिळवणारा तो 342 वा व्यक्ती ठरला. तर अशा प्रकारचे बक्षीस मिळवणारा 117 वा भारतीय ठरला सुनील दुबईमध्ये गेल्या दहा-बारा वर्षांपासून राहत आहे.
सेल्स मानच्या पगारातून त्याला फारसे उत्पन्न मिळत नव्हते पण आता तब्बल सात कोटी रुपये त्याच्या खिशात आल्याने या रकमेचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्याची मनीषा त्याने बोलून दाखवली यापैकी काही रक्कम दान करण्याची त्याची इच्छा आहे तर एखादे घर खरेदी करावे असेही त्याला वाटत आहे. आई-वडिलांची आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी चर्चा करून आपण निर्णय घेणार असल्याचे त्याने स्पष्ट केले





