संप करणाऱ्यांचा पगार कापला
Updated On:

कोलकाता : –कोल इंडियाची उपकंपनी असलेल्या महानदी कोलफिल्ड या कंपनीने तीन दिवस संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आठ दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय घेतला आहे.
खाण खासगीकरणाविरोधात येथील कर्मचाऱ्यांनी दोन जुलैपासून तीन दिवस संप केला होता. त्यामुळे 20 हजार कर्मचाऱ्यांचा आठ दिवसांचा पगार कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याअगोदर 2010 मध्ये कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप केला होता. हा संप बेकायदेशीर होता. त्यामुळे पगार कापला असल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे.





