रुपया दोन आठवड्याच्या नीचांकावर
Updated On:

मुंबई – शेअर बाजारात झालेली विक्री आणि इतर कारणामुळे रुपयाच्या मूल्यात सोमवारी 18 पैशांची घट होऊन रुपयाचा दार दोन आठवड्याच्या नीचांकी पातळीवर आला आहे.
या घटनाक्रमालाबद्दल विश्लेषकांनी सांगितले की, अमेरिकेमध्ये महागाई वाढत आहे. त्यामुळे अमेरिकेची रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करण्याची शक्यता असल्यामुळे जागतिक चलन बाजारात डॉलरचा दर वधारत असल्यामुळे रुपया सह इतर चलनांच्या मूल्यावर दबाव येऊ लागला आहे.
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासन रुपयाचा दर कमी झाला आहे. बरेच आयातदार डॉलरची खरेदी करीत असल्यामुळे रुपयाचा दर कमी झाला असल्याचे दिसून आले. शेअर बाजारातही आज विक्री झाल्यामुळे त्याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावर झाला.





