अफवा ठरली खरी! अभिनेत्री स्वरा भास्कर गरोदर; फोटो शेअर करत दिली महिती

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करला नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे ट्रोल केले जाते. चार महिन्यांपूर्वीच तिने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत लग्न केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ती गरोदर असल्याची चर्चा रंगली होती. मात्र ही अफवा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ही अफवा आता खरी ठरली आहे. स्वरा भास्कर लग्नानंतर अवघ्या काही महिन्यानंतरच गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: स्वराने फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.
स्वराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एका फोटोसह तिच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे. फोटोमध्ये स्वरा पती फहादसोबत दिसत आहे. तिने गुलाबी रंगाचा पोशाख घातला आहे ज्यामध्ये तिचा बेबी बंप देखील स्पष्ट दिसत आहे. फोटो शेअर करताना, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कधीकधी तुमच्या सर्व प्रार्थनांचे एकाच वेळी उत्तर दिले जाते! आशीर्वाद द्या, कृतज्ञ, उत्साही! आम्ही संपूर्ण नवीन जगात पाऊल ठेवत आहोत.” यासोबतच तिने ‘कमिंग सून’, ‘कुटुंब, ‘ऑक्टोबर बेबी’, असेही पोस्टमध्ये लिहिले आहे. सध्या तिच्या पोस्टवर चाहत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Sometimes all your prayers are answered all together! Blessed, grateful, excited (and clueless! ) as we step into a whole new world! 🧿❤️✨🙏🏽 @FahadZirarAhmad #comingsoon #Family #Newarrival #gratitude #OctoberBaby pic.twitter.com/Zfa5atSGRk
— Swara Bhasker (@ReallySwara) June 6, 2023
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर स्वरा भास्कर जुलैमध्ये मुलाला जन्म देणार असल्याचे बनावट स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये लिहिले होते की, ‘बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर प्रेग्नंट झाली, पती फहाद अहमदने याबाबत सांगितले आहे. अभिनेत्रीची प्रसूती जुलै महिन्यात होऊ शकते.’ मात्र त्यानंतर काहीच वेळात एका वृत्तवाहिनीने ‘अभिनेत्री स्वरा भास्करशी संबंधीत करण्यात आलेले ट्वीट हे फेक आहे. असे कोणतेही ट्वीट आम्ही केलेले नाही’ या आशयाचे ट्वीट केले. मात्र आता ही अफवा खरी ठरल्याचे दिसते.
दरम्यान, स्वराने फेब्रुवारीमध्येच ८ वर्षांनी लहान फवादशी लग्न केले. यापूर्वी लग्न न करताच स्वरा भास्कर आई होणार असल्याच्या चर्चा सोशलवर रंगल्या होत्या. तसेच मुस्लिम मुलाशी लग्न केल्यामुळे ती चांगलीच ट्रोल झाली होती.





