Allu Arjun : नियम सर्वांना सारखेच! ओळख पटविण्यासाठी अल्लू अर्जुनला मास्क काढायला लावला अन्… ; अभिनेत्याने काय केलं? पाहा VIDEO

Allu Arjun : साऊथचा अॅायकॅान स्टार म्हणून अभिनेता अल्लू अर्जुनला ओळखलं जातं. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. तो आपल्या हटक्या स्टाईलमुळे सतत चर्चेत असतो. नुकताच अल्लू अर्जुन मुंबई विमानतळावर स्पॅाट झाला. मुंबई विमानतळावरील त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत अल्लू अर्जुन आणि सीआयएसएफ जवान पाहायला मिळत आहे. दोघांमध्ये काही संवाद सुरू असल्याचं दिसत आहे. त्यानंतर काही वेळातच अल्लू अर्जुन आपल्या तोंडावरचा मास्क काढतो, नेमकं काय घडलं ते पाहूयात…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ मुंबई विमानतळावरचा आहे. अल्लू अर्जुन मुंबई विमानतळावर सुरक्षा तपासणीच्यावेळी सीआयएसएफ जवान त्याची ओळख पटवण्यासाठी त्याला मास्क काढण्यास सांगतो. सुरूवातीला अल्लू अर्जुन नकार देतो. मात्र, त्यानंतर त्याला मास्क काढवा लागला आहे.
त्याने पांढरा टी-शर्ट आणि काळ्या पॅन्ट परिधान केली होती. डोळ्याला गॉगल आणि तोंडाला मास्क लावला होता. यावेळी अल्लू त्याच्या सिंपल लूकमध्ये दिसत आहे. या जवानाला अल्लू अर्जुन आपले आयडी प्रूफ देखील दाखविताना दिसत आहे. त्यानंतर त्याला आत सोडण्यात आले.
View this post on Instagram
अल्लू अर्जुनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. अनेकजण अल्लू अर्जुनच्या कृतीला ट्रोल देखील करत आहेत. तर नेटकऱ्यांनी सीआयएसएफ जवानाच्या कामाचं कौतुक केलं आहे. “अल्लू अर्जुन सेलिब्रिटी असला तरी नियम सर्वांसाठी सारखेच आहेत.” अशा स्वरुपाच्या कमेंट्स व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर केल्या जात आहेत.





