Pimpri | विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची – शांतिलाल मुथ्था

सांगवी,– मुलांच्या बुद्धीची वाढती क्षमता लक्षात घेता आजच्या शिक्षकांपुढे फार मोठी आव्हाने आहेत. जनरेशन गॅपमुळे समाजात विविध विदारक घटना घडत असताना विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांची भूमिका फार महत्वाची आहे. प्रा. संपतराव गर्जे यांच्यासारख्या मूल्याधिष्ठित शिक्षकांचा यात मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन बीजेएस संस्थेचे अध्यक्ष शांतिलालजी मुथ्था यांनी केले.
संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृहात प्रा. संपत गर्जे यांच्या शिक्षण सेवापूर्ती समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून शांतिलालजी मुथ्था बोलत होते. यावेळी भारतीय जैन संघटना प्रबंध समितीचे अध्यक्ष मा. विलासजी राठोड, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. डॉ. सुधाकरराव आव्हाड, ज्येष्ठ उद्योजक मा. आबाशेठ नागरगोजे, प.पू. शिवानंद स्वामी महाराज, ह.भ.प. प्रवीण महाराज शेंडकर, बीजेएसचे प्रकल्प अधिकारी सुरेश साळुंके, प्राचार्य संतोष भंडारी, प्रा. दिलीपकुमार देशमुख, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र कोकणे, पर्यवेक्षक श्री पांडुरंग पवार, गजानन वाढे, माजी विद्यार्थी समिती समन्वयक अशोक पवार, आदी उपस्थित होते.
राज्यभरातून शेकडो माजी विद्यार्थ्यांनी आवर्जून या समारंभाला उपस्थिती लावली. प्रास्ताविक वैभव सोनवणे यांनी, कवयित्री सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन, तर माजी प्राचार्य दीपक गर्जे यांनी आभार मानले.





