त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद; राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन

Updated On:
त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद; राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन

मुंबई :- त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संयम बाळगावा असे कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

नांदेड, अमरावती, मालेगावात दगडफेक; त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ सुरू होता बंद!

यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे. तसेच पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळण्याचे आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्यरत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Flydubai Pilot Attack : विमानाचा ताबा घेणाऱ्या व्यक्तींबद्दलची माहिती अंधारातच

2026-10-04 17:27:55

Flydubai Pilot Attack : विमानाचा ताबा घेणाऱ्या व्यक्तींबद्दलची माहिती अंधारातच

M K Stalin : सामान्यांच्या अडचणींकडे लक्ष आहे का? स्टॅलिन यांचा मुख्यमंत्री विजय यांना सवाल

2026-10-02 16:08:14

M K Stalin : सामान्यांच्या अडचणींकडे लक्ष आहे का? स्टॅलिन यांचा मुख्यमंत्री विजय यांना सवाल

Raghav Chadha : "पंजाबला अमली पदार्थमुक्त करण्याची भाजपची क्षमता" ; राघव चड्ढा यांचं मोठं वक्तव्य

2026-10-01 12:53:10

Raghav Chadha : "पंजाबला अमली पदार्थमुक्त करण्याची भाजपची क्षमता" ; राघव चड्ढा यांचं मोठं वक्तव्य

water : पाणी उकळूनच पिण्याचे आवाहन

2026-07-15 08:03:34

water : पाणी उकळूनच पिण्याचे आवाहन

Northeast Rain : आसाम-अरुणाचलमध्‍ये पावसाचा कहर; २२ हजारांहून अधिक नागरिक प्रभावित

2026-06-29 19:03:27

Northeast Rain : आसाम-अरुणाचलमध्‍ये पावसाचा कहर; २२ हजारांहून अधिक नागरिक प्रभावित