‘मैने पायल है छनकाई’ या गाण्याच्या रिमिक्सवरून ए.आर. रहमानने नेहा कक्कर भडकले म्हणाले,’तू कोण आहेस…’

मुंबई – गायिका नेहा कक्करच्या ‘ओ सजना’ या लेटेस्ट गाण्याने रिमिक्स गाण्याबाबत पुन्हा एकदा म्युझिक इंडस्ट्रीमध्ये वाद निर्माण झाला आहे. फाल्गुनी पाठकच्या ‘मैने पायल है छनकाई’ या सदाबहार गाण्याचे रिमिक्स व्हर्जन बनवून नेहा ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे.
फाल्गुनी पाठकही नेहा कक्करवर नाराज आहे. या वादात काही गायकांनी फाल्गुनीला पाठिंबा दिला आहे, तर अनेकांनी नेहाच्या समर्थनात उतरले आहे. आता संगीत क्षेत्रातील दिग्गज एआर रहमान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
इंडिया टुडेशी संवाद साधताना एआर रहमानने रिमिक्स संस्कृतीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेहा कक्करचे नाव घेता म्हटले की,’मी हे जितके जास्त पाहतो (रिमिक्स संस्कृती), तितकेच ते विकृत होत जाते. संगीतकाराचा हेतू विकृत होतो. लोक म्हणतात – मी त्याची पुन्हा कल्पना केली आहे. पुन्हा कल्पना करणारी तू कोण? मी नेहमी दुसऱ्याच्या कामाची काळजी घेत असतो. तुम्ही इतरांच्या कामाचा आदर केला पाहिजे आणि मला वाटते की हे ग्रे एरिया आहे. आपण हे सोडवायला हवे.’
हा संपूर्ण वाद 90 च्या दशकातील ‘मैने पायल है छनकाई’ या आयकॉनिक गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनचा आहे. जे नेहा कक्करने गायले आहे. हे गाणे रिलीज झाल्यापासून नेहावर टीका होत आहे. फाल्गुनीचे हे सुंदर गाणे नेहाने खराब केल्याचे यूजर्सचे म्हणणे आहे. फाल्गुनीनेही नेहाची खिल्ली उडवली आणि गाणे ऐकून तिला उलट्या होत असल्याचे सांगितले. नेहाने देखील द्वेषपूर्ण टिप्पण्यांकडे दुर्लक्ष केले आणि तिच्या चाहत्यांच्या समर्थनाबद्दल आभार मानले.





