बजरंगी भाईजान 2 ची रिलीज डेट लवकरच होणार जाहीर

अनेक प्रसंगी सलमान ‘बजरंगी भाईजान’चा सीक्वल येणार असल्याचेही सांगताना दिसला. त्यावर काम सुरू आहे. आता चित्रपटाचे लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी ‘बजरंगी भाईजान 2’ला दुजोरा दिला आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माच्या आगामी ‘रुस्लान’ चित्रपटातील कार्यक्रमाचा असल्याचे दिसत आहे. त्यातच व्ही.विजयेंद्र प्रसाद यांनी ‘बजरंगी भाईजान 2’ बनवणार असल्याची पुष्टी केली आहे. यावर एक मोठी माहितीही समोर आली आहे की, ‘बजरंगी भाईजान 2’ची स्क्रिप्ट तयार आहे. या चित्रपटाबाबत सलमान खानशी चर्चाकरून रिलीज डेट जाहीर केली जाईल.’
बजरंगी भाईजानच्या पहिल्या भागात सलमानसोबत करीना कपूर, हर्षाली मल्होत्रा, ओम पुरी, नवाजुद्दीन सिद्दीकी यांसारखे स्टार्सही दिसले होते. या चित्रपटाने भारतात 320.34 कोटी रुपयांची कमाई केली होती आणि जगभरात 700 कोटींहून अधिक व्यवसाय केला होता.





