बंडातात्या कराडकर संतापले म्हणाले,’उद्धव ठाकरे-अजित पवार ही ढवळ्या पवळ्याची जोडी’

सातारा – सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात विरोधकांनी टीका केली आहे. भाजपने विरोध करताना राज्याला मद्यराष्ट्र करण्याचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोप केला होता. आता वाईन विक्रीसंदर्भात साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संगतीत राहून बिघडले असं म्हटलं आहे. यावेळी बंडातात्या कराडकर यांनी म्हटले की, ”मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पूर्वी तसे नव्हते मात्र आता या महाविकास आघाडीत आल्यामुळे ते बिघडले.” कराडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ढवळ्या आणि पोवळ्याची उपमा दिली आहे. ”ढवळ्या शेजारी बांधला पोवळा” ही म्हण सांगताना त्यांनी उध्दव ठकरे हे ‘ढवळ्या’ असून अजित पवार ‘पोवळा’ असल्याचं म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले,’ज्यातील सर्वच नेत्यांची मुले ही दारु पितात असे सांगताना बंडातात्या कराडकर यांनी आरोप केला. या आरोपामुळे वाईनच्या विरोधाबरोबर आता बंडातात्या कराडकर हे महाविकास आघाडीच्या रडारवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.’





