सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या घटस्फोटाचे खरे कारण आले समोर; ‘या’ माॅडेलच्या प्रेमात झाला होता गुल…

नवी दिल्ली – एक पाकिस्तानी मॉडेल-अभिनेत्री आयशा उमर ही सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या घटस्फोटाचे कारण असल्याची माहिती आता समोर येत आहे. शोएबने सानियाची फसवणूक केल्याचे बोलले जात आहे. शोएब आणि आयशाचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत. एका मासिकासाठी त्यांनी बोल्ड फोटोशूट केले होते. दोघे एकमेकांच्या खुप जवळ होते आणि याच कारणामुळे सानिया मिर्झानेही घटस्फोटाचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. कारण एखाद्या स्त्रीला आपला पती दुसऱ्या मुलीशी संबंध ठेवतो हे कधीच सहन होत नाही. त्यामुळेच सानियाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याचे आता बोलले जात आहे.
Ayesha Omar and Shoaib Malik Photoshoot gone viral https://t.co/uq7L4qQJOj pic.twitter.com/rwtGwrMCKk
— Lollywood Life (@Lollywood_Life) October 11, 2021
दरम्यान, गेल्या वर्षी शोएब आणि आयेशा उमर एकत्र दिसले होते. दोघांनी एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले होते, ज्यामध्ये दोघेही खूप जवळ दिसत होते. हे फोटोशूट स्विमिंग पूलमध्ये झाले आहे. त्यावेळीही दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. शोएब मलिकने हे फोटोशूट त्याच्या इंस्टाग्रामवर 8 ऑक्टोबर 2021 रोजी शेअर केले होते.
shoaib malik okay but i had higher expectations from ayesha omar, why would u even agree to this? https://t.co/N9vOfVwl6E
— haider (@zuhaider) October 11, 2021
याशिवाय या दोघांचे इतरही अनेक फोटोशूट व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर आयशा उमर आणि शोएब मलिक यांच्या लग्नाची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू झाली होती. एका यूजरने तर लिहिले की, शोएब मलिक आयशा उमरसोबत दुसऱ्या लग्नाला पात्र आहे. आयशा उमरनंतर शोएबने आणखी एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत बोल्ड फोटोशूट केले. हनिया अमीर असे या अभिनेत्रीचे नाव आहे. हानियासोबत केलेले फोटोशूटही व्हायरल झाले होते.
Shoaib Malik deserves a second marriage with Ayesha Omar 😂 pic.twitter.com/RzDiLXSTry
— Becauseofsaiim ⚡ (@memes_sp0t) November 7, 2021
सानिया मिर्झा, शोएब मलिक आणि घटस्फोट –
सानिया मिर्झा आणि शोएब मलिकमध्ये सर्व काही ठीक चालले नाही, मीडियाला कोणत्याही स्त्रोताकडून याची माहिती नव्हती, परंतु स्वत: सानिया मिर्झाच्या इन्स्टाग्राम स्टोरीने या अंदाजांना बळ दिले. ही पोस्ट नंतर हटवण्यात आली. यानंतर सानिया मिर्झाने आपल्या मुलासोबतचा फोटो टाकला. कॅप्शनमध्ये लिहिले आहे – “असे क्षण, जे सर्वात कठीण दिवसांमध्ये दिलासा देतात, त्यांच्यावर मात करण्याची शक्ती देतात.” त्याचवेळी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकच्या अगदी जवळच्या व्यक्तीने इनसाइडस्पोर्ट या वेबसाइटला सांगितले की, सानिया मिर्झा आणि तिचा पती बराच काळ वेगळे राहत होते. आता औपचारिकपणे दोघांनी घटस्फोट घेतला आहे.





