Yugendra Pawar : मावळातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे. नुकताच शरदचंद्र पवार गटातर्फे वडगाव मावळमध्ये झालेल्या कार्यकर्ता आढावा बैठकीत युगेंद्र पवार यांनी “बारामतीमध्ये आताही मोठ्या प्रमाणात दहशत आहे. मावळात जे आमदार आहेत त्यांचे खरे बॉस बारामतीत बसले आहेत,” असे विधान करत खळबळ उडवून दिली आहे. या बैठकीत बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. या विधानातून युगेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांचे नाव न घेत जोरदार टोला लगावला आहे. मावळातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाच्या वतीने तशी आखणी करण्यास सुरूवात झाली आहे. आगामी निवडणुकांची तयारी आणि स्थानिक प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. दरम्यान, युगेंद्र पवार यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या कार्यकर्ता आढावा बैठकीस पुणे जिल्हाध्यक्ष आमदार जगन्नाथ बापू शेवाळे, युवक जिल्हाध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष प्रमोद गोतारणे, मावळचे अध्यक्ष दत्ता पडवळ यांसह अनेक मान्यवर उपस्थिती होते. हेही वाचा : अखेर स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला अटक; १७ विद्यार्थींनीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली कारवाई