The Raja Saab Trailer Release : दक्षिणेतील सुपरस्टार प्रभासच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ‘द राजा साब’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरची चाहत्यांना आतुरतेने प्रतीक्षा होती. प्रदर्शित होताच हा ट्रेलर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. ट्रेलरमध्ये काय खास? या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना अॅक्शन, रोमान्स, हॉरर आणि कॉमेडी यांचे धमाल मिश्रण पाहायला मिळते. प्रभाससह बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता संजय दत्त आपल्या नव्या आणि खतरनाक रुपामुळे विशेष चर्चेत आला आहे. त्याचा प्रभावी अवतार प्रेक्षकांना भुरळ घालतो. या चित्रपटात अभिनेत्री निधी अग्रवालही महत्त्वाच्या भूमिकेत दिसते. निर्मिती आणि भाषा ‘द राजा साब’ हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट असून याची निर्मिती पीपल मीडिया फॅक्टरी या बॅनरखाली करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मारुती यांनी केले आहे. हा चित्रपट एकाच भाषेत नव्हे तर पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांमध्ये याबद्दल मोठी उत्सुकता आहे. रिलीज तारीख चाहत्यांना अजून थोडा काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण हा चित्रपट 9 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर शेअर करताना प्रभासने आपल्या इंस्टाग्रामवर लिहिले,“‘द राजा साब’च्या दुनियेत तुमचे स्वागत आहे. ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे. आपण 9 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये भेटू.” प्रभासच्या या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. आता सर्वांच्या नजरा या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीकडे लागल्या आहेत.