बॉलीवूडचा बादशाहला महिलेने केले पब्लिकली किस

मुंबई – बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानची चाहत्यांमध्ये किती क्रेझ आहे हे सर्वाना माहितीच आहे. शाहरुख खान जिथे जातो तिथे त्याच्या चाहत्यांची मोठी रांग असते. शाहरुखच्या फॅन्समध्ये महिला चाहत्यांचे प्रमाण जास्त आहे. अलीकडेच शाहरुख खानने दुबईतील एका कार्यक्रमात हजेरी लावली, जिथे त्याने मित्राच्या रिअल इस्टेट ब्रँडची जाहिरात केली होती.
शाहरुखने चाहत्यांसह कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनेकांना भेट दिली. अशात या कार्यक्रमातील त्याचा एक व्हिडिओ सोशलवर तुफान व्हायरल होत आहे. आता किंग खानला समोर पाहून एका महिला चाहतीने पब्लिकली किस ( जाहीर चुंबन) केले. यादरम्यानच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये शाहरुख खान त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत दिसत आहे. आधी त्याच्या एका चाहत्याने त्याच्याशी हाथ मिळवला यानंतर एक महिला आली आणि शाहरुखला विचारते की मी तुला किस करू शकते का ? शाहरुख काही उत्तर देण्यापूर्वीच महिलेने त्याच्या गालावर किस केले.
शाहरुख खानच्या चाहत्यांची अशी क्रेझ यापूर्वीही पाहायला मिळाली आहे. फक्त एक झलक पाहण्यासाठी त्याचे शेकडो चाहते किंग खानच्या घराबाहेर जमतात. शाहरुख खानसुद्धा त्याच्या चाहत्यांना निराश करत नाही. अनेकदा शाहरुख त्याच्या बंगल्यातून बाहेर पडतो आणि त्याच्या चाहत्यांना भेटतो.





