Satara : बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून प्रकल्प आणणार

सातारा : जिल्ह्याच्या विकासासाठी या पुढील काळात आपण भरीव योगदान देणार असून बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून अनेक प्रकल्प सातारा जिल्ह्यात आणण्याचे वचन खा. उदयनराजे भोसले व ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. पश्चिम महाराष्ट्राचे आकर्षण असणार्या ‘रचना प्रॉपर्टी एक्स्पो 202४३’ या बांधकामविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन ढोल ताशांच्या निनादात, शिंग तुतार्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत खासदार उदयनराजे भोसले व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते रंगारंग कार्यक्रमाने झाले. त्यावेळी ते बोलत होते.
रचना प्रदर्शन जिल्हा परिषद मैदानावर 2९ डिसेंबर रोजी सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेतखुले राहणार असून प्रवेश विनामूल्य आहे. बिल्डर्स असोसिएशनच ऑफ इंडियाचे नॅशनल व्हाइस प्रेसिडेंट आनंद गुप्ता, ‘बीएआय’ चे महाराष्ट्र स्टेट चेअरमन अनिल सोनवणे, नॅशनल सेक्रेटरी मोहिंदर रिझवाणी, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी नॅशनल प्रेसिडेंट अविनाश पाटील, भगवानराव देवकर, माजी स्टेट चेअरमन सुधीर घार्गे, दत्ताजी मुळे, सचिन देशमुख, क्लासिक ग्रुपचे डायरेक्टर सुमित बगाडे, स्कॉन इन्फ्रा प्रिस्ट्रेस एलएलपी चे मॅनेजिंग डायरेक्टर उमेश भुजबळराव, कंग्राळकर असोसिएटस्चे चेअरमन श्रीधर कंग्राळकर, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चिफ मॅनेजर आकांक्षा भूमिवाल, कालिका स्टीलचे प्रमोटर आणि फाऊंडर अनिल गोयल, परफेक्ट हाऊसचे चेअरमन विपुल गिलानी
व बिल्डर्स असोसिएशनचे सातारा सेंटर चेअरमन सुधीर ठोके, व्हाईस चेअरमन सयाजी भोसले, सेक्रेटरी हर्षद वालावलकर, खजिनदार पृथ्वीराज पाटील, कौन्सिल मेंबर अनिल दातीर, सुधीर घार्गे व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा सेंटरने सातारासारख्या छोट्या शहरात ‘रचना’सारख्या भव्य वास्तू प्रदर्शनाचे आयोजन करून सातारा सेंटरने देशभर नावलौकिक मिळवल्याबद्दल सातारा सेंटरचा खा. उदयनराजे भोसले व ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गौरव केला.बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचे अध्यक्ष सुधीर ठोके म्हणाले की, जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला भूषणावह ठरेल असे रचना प्रॉपर्टी एक्स्पो 202४ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकांकडून या उपक्रमाला वाढता प्रतिसाद आहे. प्रदर्शनास भेट देणार्यांची संख्याही दरवेळी वाढत आहे. यावेळी सुमारे चार लाखांपेक्षा जास्त नागरिक भेट देतील व सुमारे १२० कोटींपेक्षा जास्त उलाढाल रचना प्रदर्शनामध्ये होईल ही अपेक्षा आहे.
बिल्डर्स असोसिएशनच्यावतीने ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सन्मानचिन्ह, बुके देऊन सुधीर ठोके यांनी तर आनंद गुप्ता यांचा सत्कार सेक्रेटरी हर्षद वालावलकर, अनिल सोनवणे यांचा सत्कार खजिनदार पृथ्वीराज पाटील यांनी व अन्य मान्यवरांचा सत्कार सयाजी भोसले व पदाधिकाऱ्यांनी केला. सूत्रसंचलन साहिल शेख यांनी केले. हर्षद वालवलकर यांनी आभार मानले. सर्व प्रमुख मान्यवरांनी प्रदर्शनातील सर्व स्टॉल्स्ची पाहणी करून माहिती घेतली. उद्घाटन समारंभास बिल्डर्स असोसिएशनच्या मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, बारामती, इचलकरंजी, फलटण, पंढरपूर व अन्य शहरातील पदाधिकारी, सातारा सेंटरचे सर्व पदाधिकारी, बिल्डर्स असोसिएशच्या महिला विंग स्फूर्तीच्या सर्व सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते.





