सेवा क्षेत्राची उत्पादकता आणखी घसरली

मुंबई – गेल्याच आठवड्यात जून महिन्यात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली होती. आता सेवा क्षेत्राचीही उत्पादकता निर्बंधांमळे मोठ्या प्रमाणात कमी झाली असल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार जून महिन्यामध्ये सेवा क्षेत्राचा पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स म्हणजे पीएमआय केवळ 41.2 टक्के इतका नोंदला गेला आहे. मे महिन्यामध्ये हा निर्देशांक 46.4 टक्के इतका होता. निर्देशांक 50 अंकाच्या खाली असल्यानंतर हे क्षेत्र आंकुंचन पावत असल्याचे समजले जाते.
11 महिन्यांमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात या निर्देशांकाची हानी झाली आहे. बऱ्याच राज्यातील निर्बंध कमी होत आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये हे निर्देशांक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. निर्बंधाचा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रावर अधिक वेगात परिणाम होतो. देशांतर्गत व्यवसायाबरोबरच निर्यातीवरही परिणाम झाला असल्याचे दिसून येते.





