छोट्या साबणाची किंमत तब्बल एकशे त्रेचाळीस कोटी

शिक्का उठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साबणाला विक्रमी किंमत
बीजिंग : पूर्वीच्या काळात राजे-महाराजे महत्त्वाच्या कागदपत्रांवर शिक्का उठवण्यासाठी साबणासारख्या एखाद्या वस्तूचा वापर करत असत महाराजांसाठी ही महत्त्वाची वस्तू मानली जात असे. आता नुकत्याच झालेल्या एका लिलावामध्ये अशा प्रकारच्या एका साबणाला तब्बल एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांची बोली मिळाली आहे.
चार इंच लांबीचा हा साबण या विक्रमी किमतीला विकला गेला आहे. या शिक्क्याच्या एका बाजूला सिंहाची छोटी मूर्ती आहे तर दुसऱ्या बाजूला नक्षी आहे. या साबणाचा वापर कॅनलॉन्ग सम्राट करत असे लंडनमधील चिनी मुत्सद्दी कीऑलिव्ह कान यांनी त्यांच्या संग्रहात अनेक मौल्यवान वस्तू ठेवल्या असून त्यामध्येच हा साबण होता.
हा साबण लिलावात विकला जाण्याची बातमी पसरतात त्याला किमान 50 कोटी रुपये मिळतील अशी अंदाज व्यक्त होत होता. प्रत्यक्षात लिलावामध्ये या साबण यासाठी त्याच्या तिप्पट म्हणजे 143 कोटी रुपये मिळाले.
सर्वसाधारणपणे या शिक्क्याचा वापर चिनी सम्राट एखाद्या पेंटिंगवर सही करण्यासाठी करत असत अशा अनेक पेंटिंगवर या मोहर उठल्या दिसतात. हॉंगकॉंग मधील साउथबी लिलाव कंपनीने लीलावाची प्रक्रिया पार पडली असून आशियात आतापर्यंत झालेला हा सर्वात मोठा लिलाव व्यवहार मानण्यात येत आहे.





